यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंके) – गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या भयंकर आजाराने अनेक नागरिकांचे बळी गेले या भूमीवर गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली. कोणताही परिणाम दिसून येत नसल्यामुळे शासनाला पुन्हा गंभीर स्वरूपाचा निर्णय घ्यावा लागला म्हणून पुन्हा राज्य सह जळगाव जिल्ह्यात पुन्हा खडक लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून आज फैजपुर शहरात अकरा वाजे नंतर केवळ अत्यावश्यक सेवा यांना परवानगी देण्यात आली आहे आणि विनाकारण दुकान उघडून किंवा बाजारात गर्दी करू नये म्हणून विनाकारण जाणे येणे याला प्रतिबंध बसावा म्हणून फैजपुर शहरात सुद्धा याची काटेकोरपणे पोलीस व नगरपरिषद गंभीरपणे दखल घेऊन कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे कोणत्याही रिकाम्या येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनासह नागरिकावर पोलीस नजर ठेवत असून कोरोनालाश्वडाऊन हाच एक पर्याय उरलेला असल्याचे शासनाचा कडून सुद्धा वेळोवेळी सांगण्यात येत आहे.
नागरिकांनी याचे पालन करावे हाच एक महत्वाचा मार्ग असल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे म्हणून फैजपूर शहरात याचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून येथील फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे स्वतः गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर उतरले आहे त्यांच्या पाठोपाठ नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण हे सुद्धा गेल्या वर्षभरापासून अतोनात मेहनत घेत आहे तसेच फैजपूर येथील ए पी आय प्रकाश वानखडे व पी एस आय रोहिदास ठोंबरे हे सुद्धा गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावात बंदोबस्त ठेवून जबाबदारी पार पाडत आहे म्हणून नरेंद्र पिंगळे एपीआय प्रकाश वानखडे पी एसआय रोहिदास ठोंबरे. हे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख झाली आहे त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी अनिल महाजन राजेश भराटे विलास झांबरे वाहतूक पोलीस बाळू भाई दिनेश भोई दिलीप तायडे व होमगार्ड अरुण धनगर हेमा धनगर सर्व कर्मचारी मिळून चोख बंदोबस्त ठेवला आहे.






