स्व.अशोकभाऊ बहुऊद्देशीय व शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

करोना काळात रक्तदान शिबीर संकल्पना राबवणे व त्यातुन गरजवंताचे प्राण वाचवणे म्हणजे माणुसकी जिवंत आहे – मनसे जिल्हाध्यक्ष हितेंद्र महाले

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – सध्या देशात व देशातील प्रत्येक राज्यात,ग्रामीण भागापर्यंत करोना आजाराचा प्रभाव जनतेवर पडत आहे. त्यात महाराष्ट्र राज्यात करोना रूग्ण संख्या जास्त आहे. त्यामुळे बाधित रूग्णांना औषधी सोबत रक्त पुरवठ्याची नितांत गरज आहे. आज महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. म्हणून ह्या कठीण परिस्थितीत दोंडाईचा सारख्या धड तालुकाही नसलेल्या निमशहरी भागात रक्तदान शिबीर संकल्पना राबवणे व त्यातुन गरजवंताचे प्राण वाचवणे म्हणजे करोनासारख्या कठीण काळात माणुसकी जिवंत असल्याचे मत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक हितेंद्र महाले यांनी स्व. अशोकभाऊ बहुऊद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबीराच्या प्रसंगी व्यक्त केले.

आज दिनांक ९ मे रोजी स्टेशन भागातील श्री राम मंदीर येथे सकाळी ९ : ०० वाजेपासुन स्व. अशोकभाऊ बहुऊद्देशीय व शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान सेवाभावी संस्थेतर्फे लसीकरणपुर्वी रक्तदान शिबीर संकल्पना राबविण्याचा कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शिबीराला शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल, नगरसेवक नरेन्द्र गिरासे,कुष्णा नगराळे, जनमत अध्यक्ष दौलतराव सुर्यवंशी, जीवन भोई,राकेश अग्रवाल, सुनीता साडी कल्केशनचे मालक संजय अग्रवाल आदींनी धावती भेट दिली.

raktdan-shibir

यावेळी माजी मनसे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक हितेंद्र महाले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाराष्ट्र राज्यात मागील वर्षापासून उद्भवलेल्या करोना परिस्थितीत रक्ताचा साठा कमी पडत आहे. म्हणजे मागणी जास्त व पुरवठा कमी आहे. म्हणून शासनाला आज लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रक्ताच्या साठ्याची खुप मोठी गरज आहे. म्हणून सरकार करोनाच्या ह्या कठीण परिस्थितीत वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने जनतेला रक्तसाठा जमा करण्यासाठी शिबीरे आयोजित करण्याचे सांगत आहे. म्हणून स्व. अशोकभाऊ बहुऊद्देशीय व शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान सेवाभावी संस्थेतर्फे लसीकरणपुर्वी रक्तदान करण्याची संकल्पना अगदी योग्य पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात आली आहे. ती म्हणजे लसीकरणपुर्वी रक्तदान. जर एखाद्या व्यक्तीस ह्या कठीण परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारला मदत म्हणून रक्तदान करायचे असेल तर ते लसीकरणपुर्वी करता येईल. ऐकवेळा लसीकरण झाले तर त्याला पुढील काही महिने रक्तदान करता येणार नाही. म्हणून आज दोंडाईचा सारख्या धड तालुकाही नसलेल्या निमशहरी भागात सरकारला मदत म्हणून रक्तदान शिबीर राबवणे म्हणजे अजुनही माणसांमध्ये माणुसकी जिवंत असल्याचे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी ह्या शिबीरास धुळे येथील जीवन ज्योती ब्लड बँकचे डॉ. भाग्यश्री सैदांणे,सुचीत्रा विश्वास, दिनेश पाटील, जगदीश सोनार आदींचे सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रामोळे, प्रफुल्ल भोई, केदार चौधरी, मनोज माळी,मोहसीन सोनवणे, बाबाजी धनगर, मनीष ठाकुर, लोकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here