दोंडाईचा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने दोंडाईचा नगरपालिकेला एकुण ५००लि. सोडियम हायड्रोक्लोराईट फवारणी करण्यासाठी वाटप करण्यात आले.
सध्या कोविड-१९ आजाराने सर्वच भागात मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे व शासनाने तिसऱ्या लाटेचे देखील आशंका व्यक्त केली आहे, त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने दोंडाईचा नगरपालिका येथे सोडियम हायड्रोक्लोराईट चे वाटप आज माजी मंत्री हेमंतराव देशमुख व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम दादा सनेर यांच्या हस्ते दोंडाईचा च्या पालिकेचे मुख्याधिकारी श्री. डॉ. प्रवीण निकम,उपमुख्याधिकारी हर्षल नागरे,आरोग्य निरीक्षक शरद महाजन,आरोग्य निरीक्षक संतोष माणिक यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी सदरील वाटप कार्यक्रमात माजी मंत्री नानासाहेब हेमंतराव देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत जी सनेर,युवक काँग्रेसचे प्रदेश सचीव राहुल माणिक,वसंतबापू कोळी,ऍड.प्रमोद मराठे,पुष्पक पाटील(उपजिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस), राजू बापू देशमुख,शैलेश सोनार,पिंटू महाजन, शामकांत पाटील,आबा मुंडे,नरेंद्र पाटील, संदीप पाटील,कल्लू पठाण, हुसेन बोहरी,भारत जाधव,मोनू शेख,पंकज चोळके सचिन सोनवणे,मोना सजाउद्दीन,सचिन परदेशी,मुन्ना खाटीक, पप्पू सुतारे,मनोज रामोळे, आकाश ईशी,महेश जाधव,अक्षय नगराळे,वैभव निकम,जितू निकाळजे,रामकृष्ण धनगर,दादू पाटील, निलेश ठाकूर,अमोल सोनवणे,अनिल माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



