रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक

दोंडाईचा (प्रतिनिधी) – येथील श्रीमती बसंतीबाई पाबूदानजी संचेती रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या ज्युनिअर व सिनिअर के.जीच्या बहुतेक विद्यार्थ्यांनी सन 2020-21या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीच्या पंधरा दिवसात नियमित ऑनलाईन क्लासेस केल्याने स्कूलकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

उन्हाळी सुट्टीनंतर जून महिन्यात शाळा उघडण्याची प्रतिक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षाप्रमाणेच ह्यावर्षीही कोविडमुळे ऑनलाईन क्लसेसच्या माध्यमातूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना या वयात शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व व शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून सोप्या पद्धतीने यशस्वीपणे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

rotary-school
रोटरी स्कुलचे विद्यार्थीदेखील हसत खेळत ऑनलाईन शिक्षण घेवून शिक्षकांच्या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देत आहेत.एरवी मोबाईलमध्ये फक्त गाणे, गोष्टी, गेम खेळणारे चिमुकले आता आपल्या पालकांबरोबर मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेऊन शिक्षणाचा आस्वाद घेत आहेत.त्यांचा उत्साह द्विगुणीत करून प्रोत्साहन देणे व त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे.शिस्तीचे पालन करत ऑनलाईन शिक्षण घेतले. शिक्षकांनी सांगितलेले कार्य वेळेवर पूर्ण केले.अशा बहुतेक विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.rotary-school1rotary-school2ज्युनिअर के जी.तील मन्नत केसवाणी,रियांश केसवाणी,मीत पाटील, ख्याती चौधरी व प्रज्ञा गिरासे तर सिनिअर के.जीतील पार्थ गिरी, बुरहानुद्दीन बोहरी , गायत्री परमार,चेतना जाधव,पाखी निकम ह्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्कूलचे अध्यक्ष श्री हिमांशू शाह,प्राचार्य श्री एम. पी., पवार यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. उपक्रमाच्या याशस्वितेसाठी इंचार्ज बतुल बोहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here