दोंडाईचा (प्रतिनिधी) : भारतीय स्वतंत्र दिनाच्याकार्यक्रमदोंडाईचा येथील अखिल भारतीय युवा कोळी समाजाची धुळे जिल्हा कार्यालय येथे, भारत मातेचे पूजन करून स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून आणि, केंद्रीय मानवाधिकार दिल्लीचे उत्तर महाराष्ट्र महासचिव, पत्रकार संतोष कोळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांना किराण्याचे किट वाटप दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ बापुसाहेब रवींद्र देशमुख ,माजी बांधकाम सभापती, राकेश पाटील ,महेंद्र पाटील एडवोकेट, संतोष भोई पत्रकार जे पी गिरासे, जितेंद्र गिरासे सुनील धनगर यांच्या, हस्ते वाटप करण्यात आले
मातोश्री जमुना महिला बचत गटाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर बापुसाहेब रवींद्र देशमुख, अखिल भारतीय युवा कोळी समाजाची धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी, इंदिरा काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत बापू कोळी प्रा सुरेश वाले मनोज महाजन सर नवनीत बागले गजेंद्र कानडे सर,, इत्यादींच्या उपस्थित वाटप करण्यात आले.

यावेळी रहिमपुरे चे माजी सरपंच दिनेश बेडसे भाजपाचे कैलास दीक्षित युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पुष्पक पाटील माजी, तिरमली समाजाचे अध्यक्ष जितेंद्र तिरमले केंद्रीय मानवाधिकाराचे समितीचे सदस्य अशोक तिरमली गणेश चकणे निलेश ठाकूर रावसाहेब पगारे महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ प्रमिलाबाई कोळी नंदुरबार जिल्हा अध्यक्षा सौ सरस्वती व महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.



