एक नजर इकडे पण द्या-स्टेशन भागातील राजपथ रस्त्यावरील दुकानदारांची जंग खात असलेली मागणी…
दोंडाईचा (प्रतिनिधी) – देव जाणे आज दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेला कुठून सदबुद्धी मिळाली. पण उशीरा का असेना आज मोक्याच्या मेन नंदुरबार-शहादा चौफुली व गावात येणारा डायव्हर्शन रस्त्यावरील धोकेदायक रहदारीस अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमीत टपऱ्या व पिकप शेडचे मुहूर्त सापडून, जेसीबी लावून अतिक्रमण काढण्यात आले आहे. म्हणून नगरपालीकेच्या एवढ्या मोठ्या धाडसाचे खरच कौतुक करायला हवे.
पण गावात हया बेकायदेशीर अतिक्रमीत टपऱ्या काढायच्या घटनेच्या उलट्या प्रतिक्रिया जनतेत उमटत असुन, सर्वसामान्य नागरिक व दुकानदार यांना बावरले पण सावरले नाही म्हणत.जखम डोक्याला व इलाज पायाचा असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. शेवटी ते पण माणस आहेत. त्यांनी ही लाखो रुपये खर्चुन,भाडे टँक्स भरून दुकाना घेतल्या आहेत. त्यांचीही बऱ्याच वर्षापासुनची दुकाना पुढील, सार्वजनिक रस्त्यावरील लाँऱ्या टपऱ्या काढून. लाँरी धारकांना हक्काची जागा द्यावी हीच मागणी आहे. मात्र नगरपालीका नेहमीप्रमाणे डोकेझाक करते व राजकीय गरजे पुरता मिठ चोळते.म्हणून एक नजर राजपथ रस्ता व मानराजच्या बोळीत म्हणण्याची वेळ वैतागुन व्यापारी बांधवांवर आली असुन नगरपालीकेने गाव विकासाच्या दुष्ट्रीकोनातुन शहर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी हा प्रयत्न करायला हवा,अशी अपेक्षा दुकानदारांसह सर्वसामान्य नागरिक करत आहे.
काल दुपारी दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेने अचानक नंदुरबार-शहादा चौफुली व गावात जाणारा डायव्हर्शन रस्त्यावरील सार्वजनिक जागेवर ठेवलेल्या बेकायदेशीर टपऱ्या, लाँऱ्या व पिकप शेड जेसीबी लावून काढण्यात आले. त्यामुळे सुरूवातीला टपरी धारकांमध्ये गोधंळ उडाला. मात्र सत्तेपुढे व कायद्यापुढे शहाणपण थोडे म्हणत.हळूहळू सर्वानी रजामंदी देत.दोन-चार लोकांच्या सहकार्याने आपल्या टपऱ्या, लाँऱ्या इतरत्र हरवल्या. त्यावेळी नगरपालीका प्रशासनाला काम करण्यास मोकळीक झाली. त्यामुळे लोकांना असे वाटले की, आता नगरपालीका आपला मोर्चा हळूहळू राजपथ रस्त्यावरून स्टेशन भागातील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर लाँऱ्या, टपऱ्या लावल्या आहेत. त्याच्याकडे वळवेल.मात्र नगरपालीका प्रशासनाने संध्याकाळचे सात नंदुरबार शहादा चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यात लावून दिल्याने,त्यांची पुढील भुमिका यापुढे काय ? लोकांना समजली नाही. कोण सांगायचे की,नंदुरबार चौफुलीवरील बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दिसेल अशी गाव स्वागताची कमान येत आहे. तर कोणी सांगायचे की,शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक पुतळा मध्यभागी किंवा एका साईडला येणार आहे. तर आणखी कोणी म्हणे उड्डाणपुलावर नेहमी अपघात होत असल्याने रस्ता मोठा व मोकळा करण्यासाठी हे अतिक्रमीत सार्वजनिक जागेवरील बेकायदेशीर टपऱ्या, लाँऱ्या काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र नगरपालीका प्रशासनाकडून कोणीही ठोस भूमिका सांगायला अधिकारी मोहीमेत नव्हते.
तर दुसरीकडे राजपथ रस्त्यावरील व स्टेशन भागातील दुकानदार, नागरिकही गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी, ह्या सार्वजनिक रस्त्यावरील गल्ली-बोळात असणाऱ्या टपऱ्या, लाँऱ्या नगरपालीकेने एक स्वतंत्र जागेवर हलवायला पाहिजेत. जेणेकरून लाँऱ्या टपऱ्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचाही श्वास मोकळा होऊन. कायमस्वरूपी त्यांचा हा सार्वजनिक रोडावर लाँरी टपऱ्या लावण्याचा प्रश्न सुटेल व दुकानदारही व्यवसाय करण्यास मोकळे होतील,अशी मागणी लावून धरली आहे. मात्र नगरपालीका मुख्याधिकारी येतात-बदलतात,पुढाऱ्यांची सत्ता येते-तेही बदलतात. मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी काही सुटत नाही. म्हणून कालची नगरपालीकेच्या नंदुरबार-शहादा चौफुलीवरील बेकायदेशीर टपऱ्या लाँऱ्या काढायची भुमिका सावरल्या ऐवजी बावरलेलीच लोकांना दिसली. म्हणजे जखम,बेकायदेशीर टपऱ्या- लाँऱ्या राजपथ,स्टेशन भागातील रस्त्यावर व इलाज पायाचा म्हणजे नंदुरबार-शहादा चौफुलीवरील टपऱ्या लाँऱ्या काढायच्या असेच म्हणता येईल. म्हणून आता गावातील सतरा कोटी रूपये खर्चुन व विकासात भर घारणाऱ्या राजपथ रस्ता, मानराज बोळ तसेच स्टेशन भागातील, गावातील चौका-चौकात वाढलेल्या बेकायदेशीर, अतिक्रमीत टपऱ्या, लाँऱ्या शेडवरही एक नजर द्यावी, असा सुर जाग्रत दुकानदार व नागरिकांमधुन निघत आहे.



