दोंडाईचा महर्षी वाल्मिक ऋषी जयंती निमित्त पदाधिकाऱ्यांची निवड

दोंडाईचा (प्रतिनिधी) : शहर कोळी समाजाचे आराध्य दैवत, आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची दर सालाबादाप्रमाणे जयंती साजरी करण्यात येणार आहे यासाठी राम मंदिर येथे कोळी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.



या बैठकीत आकाश कोळी वसंत बापू कोळी पत्रकार संतोष कोळी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली दोंडाईचा शहर अध्यक्ष विशाल भिका मगरे ,उपाध्यक्ष संदीप कोळी, सल्लागार पत्रकार संतोष कोळी उपाध्यक्ष सतीश कोळी ,संजय कोळी कार्याध्यक्ष, सचिव मयूर कोळी ,सोशल मीडिया प्रचारक ,सागर कोळी खजिनदार मयूर भटू सोनवणे यांची निवड करण्यात आली.


या निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेचे जिल्हा युवा प्रमुख आकाश दादा कोळी अमर शहर अध्यक्ष वसंत चित्ते संजय मगरे महेंद्र कोळी इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here