वर्धा येथे मिनी ट्रॅव्हल्स उलटून २ ठार

वर्धा (प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : मजुरांना घेऊन जाणारी मिनी ट्रॅव्हल्स दुभाजकावर चढून पलटी झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नागपूर हैद्राबाद महामार्गावर हिंगणघाटजवळ आजंती शिवारात २ नोव्हेंबरच्या रात्री घडला. या ट्रॅव्हल्समध्ये २० ते २२ प्रवाशी होते. त्यातील ४ ते ५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.

पांढरकवडा येथून (एम.एच. २९ एम. ८४५४) क्रमांकाची ट्रॅव्हल्स मजूर घेऊन नागपूरकडे भरधाव जात होती. दरम्यान, आंजती शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. फुलसिंह जैनसिंग (५०) रा. चरी, मध्य प्रदेश, सुभाष भगवान वातीले (६०) रा. पांढरकवडा जि. यवतमाळ अशी मृतकांची नावे असल्याचे सांगण्यात आले.

बसमध्ये २० ते २२ मजूर होते. अपघातात यातील ४ ते ५ मजूर किरकोळ जखमी झाले. ही माहिती हिंगणघाट ठाण्याचे ठाणेदार संपत चव्हाण यांना मिळताच त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळ गाठून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हे सर्व मजूर पांढरकवडा येथून दिवाळी सणासाठी मध्य प्रदेश येथे आपल्या गावी जात असल्याचे सांगण्यात येते. या अपघाताची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here