मेष – आज भावनिकता वर्चस्व गाजवेल, म्हणून सामाजिक स्तरावर लोकांचे बोलणे तुमच्या मनाला लागू शकते. रचनात्मक कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल परिणाम मिळतील. आईच्या तब्येतीत चांगला बदल झाल्याने तुम्ही चिंतामुक्त व्हाल. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ – कार्यक्षेत्रात सुखद परिणाम मिळतील तसेच जर एखाद्या सहकाऱ्याशी वादावादी झाली असेल तर तुम्ही त्यांची माफी मागू शकता. गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. श्वासासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून तब्येतीची काळजी घ्या. पूर्वीच्या काळी केलेल्या चांगल्या कामांचे सुखद परिणाम आज अनुभवायला मिळू शकतात.
मिथुन – कुटुंबातील सदस्याच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. तुम्ही बोलण्याच्या कलेने लोकांचे मन जिंकू शकता त्यामुळे सामाजिक तसेच कार्यक्षेत्रात शुभ फळ मिळू शकते. डोळ्यांशी संबंधित त्रास असेल तर आज धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.
कर्क – मानसिक समस्येत असलेल्या लोकांना जोडीदाराच्या सहाय्याने समस्येवर तोडगा निघू शकतो. आज तुमच्या व्यवहारात विनम्रपणा असेल. घरातील एखाद्याची तब्येत बरी नसल्यास तुम्ही नर्स सारखी त्यांची सेवा-शुश्रुषा कराल. शाळा किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना यश मिळेल.
सिंह – पैशांची देवाण-घेवाण करताना विचारपूर्वक करा. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य असेल परंतु परदेशी व्यापाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडील किंवा वडिलांसामान लोकांकडून सिंह राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. काही लोकं स्वतःच्या कमकुवत गोष्टी ओळखून त्या सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसून येतील.
कन्या – कन्या राशीच्या लोकांची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या लाभाच्या स्थानी चंद्र असल्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. बहिण किंवा मुलीकडून सुखद बातमी मिळू शकते. मोठ्या भावंडांशी मतभेद झाल्यास संबंध सुधारू शकतात.
तूळ – दिवसाची सुरुवात चांगली होईल. दिवसा कार्यक्षेत्रात चांगले अनुभव येतील तसेच कार्यालयात एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सामाजिक स्तरावर तुम्ही सक्रिय दिसून याल. वडिलांशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. पितृसंपत्ती सांभाळत असताना लाभ होऊ शकतो.
वृश्चिक – सासरच्या लोकांकडून काही लोकांना लाभ मिळू शकतो. काही जण आई-वडिलांबरोबर तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक सिद्ध होईल. गुरुजनांसोबत संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा.
धनू – चंद्र आज तुमच्या आठव्या स्थानी असल्याने तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. काही लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो. विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. विवाहित लोकांनी जोडीदाराशी नीटनेटके वागले पाहिजे.
मकर – तुमच्या सातव्या स्थानी चंद्र असल्याने वैवाहिक जीवनात सुखद फळ मिळेल. विवाहेच्छुक असल्यास लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकाच्या उत्पन्नात वाढ होईल.
कुंभ -या लोकांनी आज कार्यक्षेत्रातील राजकारणापासून लांब राहणे चांगले असेल. चंद्र तुमच्या आठव्या स्थानी असल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. तथापि तब्येतीची काळजी घ्या. मुल-बाळ असेल तर त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने तुम्ही चितेत असाल. न्यायालयीन प्रकरणात अडकला असाल तर अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने निर्णय घ्या.
मीन – दिवसाच्या सुरुवातीला आळस तुमच्यावर वर्चस्व गाजवेल परंतु दिवस जसजसा पुढे सरकेल तसतशी कामातील सक्रियता वाढत जाईल. शिक्षण क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचे निराकरण होईल. अजूनही तुम्ही अविवाहित असाल तर तुमची आज एखाद्या विशेष व्यक्तीशी भेट होऊ शकते.



