कारंजा (तालुका प्रतिनिधी हाफिज खान) : महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक दिवसीय आमरण उपोषण करण्यात आले. वाशिम जिल्हा अध्यक्ष विजय कुमार चवरे उपरोक्त वरील विषयी विनंती करण्यात आली होती
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्राम रोजगार सेवकांची संख्या २८ हजार १४४ एवढी असून राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामसभेतून ग्राम रोजगार सेवकांची ग्रामसभेद्वारे नियुक्ती करण्याचे आदेश दिले व त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आजतागायत राज्यात एकूण २८ हजार १४४ रोजगार सेवक शासनाच्या प्रशासकीय खर्चात या निधीतून सहा टक्के मानधनावर कार्यरत आहेत.
सन २००६ पासून गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवक म्हणून काम करतात पण प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनल च्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड होते पण राज्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यावर सूडबुद्धीने ग्राम रोजगार सेवकावर खोट्या प्रोसिडिंग द्वारे कामावरून कमी करून जाणीवपूर्वक अन्याय केला जातो त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास होऊन कोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते व त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण याची जिम्मेदारी कुटुंबप्रमुख म्हणून रोजगार सेवकावर असल्याने त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्याच्यावर अन्याय होतो या असे घेऊन विषय घेऊन महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना शाखा कारंजा जिल्हा वाशिम यांनी आमरण उपोषण केले







