वार्ड क्रमांक १४ मधील गणेशवाडीचा मुख्य रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांचे होताहेत हाल

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शिर्डीतील वार्ड क्रमांक १४ गणेश वाडी तील मुख्य रस्ता हा खोदून ठेवले नागरिकांचे हाल होत आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने २ सप्टेंबर २०२१ रोजी शिर्डी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना सौरभ हाडवळे यांनी निवेदन देऊन गणेशवाडीत ला जोडणारा मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे या आशयाचे निवेदन दिले होते .

निवेदनाची दखल घेत शिर्डी नगरपंचायतीने गणेश वाडी तील मुख्य रस्त्याचे काम सुरू केले काम सुरू होऊन जेसीबीच्या साह्याने बऱ्याच ठिकाणी खोदकाम झाले आणि सत्ताधारी नगरसेवकांनी ते काम बंद पाडले गणेश वाडी तील मुख्य रस्त्याचे बंद पडलेले काम पुन्हा तात्काळ सुरू करावेअन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू या रस्त्याचे श्रेय कोणीही घेतले तरी हरकत नाही पण गणेशवाडीतील नागरिकांना चांगला रस्ता देण्याचे शिर्डी नगरपंचायतीने व सत्ताधारी नगरसेवकांनी श्रेयवाद न करता लवकरात लवकर काम सुरु करावी अशी मागणी सौरभ विठ्ठल हाडवळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here