शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | सामोडे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा भारतीय जनता पक्षाच्या पिंपळनेर मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप घरटे यांचा ६० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पत्रकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिलीप घरटे यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वयाची साठ वर्षे पूर्ण करताना त्यांच्या आयुष्यातील हा विशेष क्षण आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवस सोहळ्याप्रसंगी साक्री तालुका शेतकरी संघाचे संचालक अनिल दयाराम शिंदे, पिंपळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, प्रा. शेवाळे सर, भरत बागुल, अनिल बोराडे, भिलाजी जिरे, दिलीप बोळे, निकेश भदाणे, रवींद्र मोरे, सुधाकर भदाणे, शशिकांत शिंदे, रामकृष्ण शिंदे, विश्वास भदाणे, सुनील बेडसे, विश्वास नाना शिंदे, चंद्रकांत घरटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी दिलीप घरटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. स्नेहपूर्ण वातावरणात हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.







