दुष्काळसदृश्य परिस्थितीतही साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा स्तुत्य उपक्रम

साई संस्थान

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना माननीय श्री सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व संचालक मंडळ, व्हाईस चेअरमन, सचिव श्री विलास वाणी साहेब, चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पाटील, श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिर्डी यांनी श्री साईबाबा संस्थानच्या कायम कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

 

सोसायटीच्या वतीने कर्मचाऱ्यांना ५० किलो साखर, १५ लिटर तेल, एक किलो मिठाई आणि एक किलो फरसाण असे एकूण ५,३४२ रुपये किमतीचे किराणा साहित्य देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली असून, दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार यांनी सेवाभाव जपत गावागावात कर्मचाऱ्यांच्या घराजवळ जाऊन भेटवस्तू दिल्या. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल श्री प्रशांत भानुदास गोंदकर पाटील व श्री साई द्वारकामाई सेवाभावी संस्था, शिर्डी यांनी पत्र देऊन आभार मानले आहेत.या उपक्रमाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या सर्व कायम कर्मचाऱ्यांनी संस्थेचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here