उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियांका गांधींकडे

लखनौ – काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येत आहे. काँग्रेस अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संघटन आणि कारभारात मदत करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली आहे. विशेष समितीत ए.के. अँटनी, अहमद पटेल आणि अंबिका सोनी यांचा समावेश आहे. संघटनेसंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मदतीसाठी के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे. दुसर्‍या महत्त्वाच्या निर्णयामध्ये गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, मोतीलाल वोरा, मल्लिकार्जुन खर्गे यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here