मुलीला गाडीतून शाळेत सोडायला चाललेल्या आईवर सरपंचाच्या मुलांनी केली दगडफेक

दगडफेक

रायबरेली (उत्तरप्रदेश) (वृत्तसंस्था) । एका गाडीतून आई आणि मुलगी जात असतांना, त्यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून मुलगी जोरजोरात ओरडताना दिसत आहे. मम्मा प्लीज मला वाचव अशी विनवणी करतानात ती दिसत आहे. पोलिसांनी हल्लेखोर आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

ऊंचाहरच्या जगतपूरमधील उडवा गावात राहणारी रिद्धिमा सिंह आपल्या १२ वर्षाच्या मुलीला गाडीतून शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी गावातीलच आरोपी रितेश मिश्रा, आयुष मिश्रा (सत्यम) आणि शिवम कुमार मिश्रा यांनी रस्त्यात गाडी अडवून त्यावर तुफान दगडफेक केली.

 

https://x.com/ashishpaswan0/status/2107705990376534408?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2107705990376534408%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=

 

या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून आई आणि मुलगी दोघीही जखमी झाल्या आहेत. मुलगी तर या हल्ल्यानंतर भेदरली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर फक्त उत्तर प्रदेशातच नाही तर देशभरात खळबळ माजली आहे. जर अशा प्रकारे सामान्य लोकांवर खासकरून महिलांवर भर रस्त्यात हल्ले होऊ लागले तर त्यांच्या सुरक्षेचं काय… फक्त दोन हातांनी या महिला आपलं कसं स्व संरक्षण करणार असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस अधिकारी गिरीजा शंकर त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पीडितेच्या तक्रारीनंतर गावातील सरपंचाच्या मुलांसह गावातील ४ ते ५ बड्या असामींविरूद्ध जीवघेणा हल्ला करणे आणि धमकी देण्याच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच जगतपूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या गटाकडून मारहाण केल्याच्या आरोपांची देखील चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात इतर सहभागी आरोपींना देखील त्वरित अटक करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here