अ.भा.युवा कोळी – कोरी समाज शाखेतर्फे अमरावतीच्या नवनियुक्त महिला पोलिस आयुक्त आरती सिंह यांचे स्वागत

दोंडाईचा (संतोष कोळी) – अमरावती जिल्ह्याच्या नवनियुक्त प्रथम महिला पोलिस आयुक्त आरती सिंह रुजू झाल्याबद्दल अखिल भारतीय युवा कोळी /कोरी समाज शाखा दिल्ली महाराष्ट्रच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
अमरावती जिल्ह्याला प्रथम महिला पोलिस आयुक्त मिळाल्याबद्दल शहरातील महिलांना गर्व असून, जिल्ह्यातील महिलांचे मनोबल त्यामुळे वाढले आहे. प्रसिध्दी माध्यमातून केलेल्या आवाहनामुळे जिल्ह्यातील महिलांना आनंद झाला आहे. यापुढे जिल्ह्यातील अवैध गुन्हेहारी व महिला अत्याचारांचे गुन्हे थांबतील व अमरावतीच्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी अपेक्षा अमरावतीतील महिलांनी व्यक्त केली असून, अखिल भारतीय कोळी – कोरी समाज शाखेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय युवा कोळी /कोरी समाज शाखा दिल्ली महाराष्ट्र महिला सरचिटणीस सौ.मिराताई संतोषराव कोलटेके, समाजाच्या वतीने संतोषराव कोलटेके, रविभाऊ रौराळे मनोज भाऊ झासकर, आकाश गाडे, तसेचं महिला समाज सेविका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here