कोवीड -१९ प्रमुख तहसीलदार सुदाम महाजन यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्रीपर्यंत तक्रार
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथील शिवसेना शाखेकडून नुकतेच करोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दोंडाईचा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्यावर जी जबाबदारी शासनाने टाकली होती, त्यात त्यांनी राजकीय दबावापोटी येत, कर्तव्यात कसूर करत, शहर व परिसरात करोना रुग्णांच्या संख्या उद्रेकास कारणीभूत असल्याचे आरोप करत कडक कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारीपासुन, आरोग्यमंत्री व थेट मुख्यमंत्रीपर्यंत दोंडाईचा शिवसेना शाखेकडून करण्यात आली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पोलीस अधीक्षक धुळे आदींना दिलेल्या तक्रारीचा म्हटले आहे की, मार्च २०२० अखेर पासुन संपूर्ण भारतात करोनाचा उद्रेक सुरू झाला. पंरतु सुदैवाने दोंडाईचा शहर आणि परिसरात जवळपास मे -जून पावेतो करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. या काळात भारतातील अनेक शहरातून नोकरी करता गेलेले दोंडाईचा शहर व परिसरातील नागरिक नाईलाजास्तव आपल्या घरी परतले. त्यातील अनेक सुज्ञ नागरिक तसेच आमच्या शिवसैनिकांना असे नागरिक आढळून आल्यावर त्यांना आम्ही दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी नेऊन त्यांना योग्य तो उपचार देवून संस्थागत विलीनीकरण कक्षात ठेवण्यास सांगितले, आणि तसे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्पष्ट आदेश केलेले होते व त्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता देखील करण्यात आली होती. परंतु त्यावेळी कार्यरत असलेल्या अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेचे कर्मचारी आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी यांनी सदर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करून आजतागायत संस्थागत विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्याचे साधे महत्वाचे कष्ट देखील घेतले नाही. तसेच आम्ही पाठविलेल्या बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची साधी नोंद देखील कोणीच घेतली नाही. त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच कोणत्या गावाहून परत आले ही माहिती आवश्यक असताना सुद्धा ती घेतली नाही. त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू ही अॅप डाऊन लोड करणे गरजेचे व पुढील हिताचे असताना ते देखील करण्याचे टाळले.
कोवीड नियंत्रणासाठी आणि कोवीड संदर्भात पुर्व तयारीसाठी दोंडाईचा शहर व परिसरात तसेच संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस पुरेसा कालावधी मिळून देखील आपत्ती व्यवस्थापक अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी स्वतः जिल्हाधिकार्याकडून तसेच दोंडाईचा शहरातील आमच्या शिवसैनिकाकडून मागणी करून देखील कोणतीही तयारी केली नाही, आणि उलट आम्ही पत्र देवून देखील त्याची दखल घेतली नाही. ते प्रशासनाचे अधिकारी म्हणून नव्हे तर स्थानिक राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली राजकीय हस्तकाप्रमाणे वागत राहिले. मा. अप्पर तहसीलदार यांना स्वतःचे कार्यालय असुन देखील ते राजकीय दबावापोटी दोंडाईचा नगरपालिकेच्या कार्यालयात आपला मुक्काम ठोकला व त्यांच्या सुचनांप्रमाणे वागत राहिले आणि दुसरीकडे करोना त्याचे काम करित राहिला.
नियमाप्रमाणे एखाद्या कोवीड संशयित व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर सदर व्यक्तीस त्याचा स्वॅबचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असताना दोंडाईचा शहरात मात्र स्वॅब दिल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत सदर व्यक्ती संपूर्ण गाव फिरून यायचा. विलगीकरण कक्षच स्थानिक प्रशासनाने सुरू न केल्यामुळे कोवीडचा उद्रेक दोंडाईचा शहर व परिसरात वाढला यास संपूर्ण जबाबदार हे अधिकारीच आहेत.
उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथे रूग्णांना योग्य व आवश्यक ती सेवा न देता त्यांना येथील अधिकाऱ्यांनी सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच कोवीळ रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी हे अस्पृश्यतासारखी वागणूक देत होते. कोवीळ साठीच्या रेमीडीसिव्हीर सारखे इंजेक्शन आवश्यक असताना आणि परवानगी असताना देखील ते मागविण्याची तसदी घेण्यात आली नाही. 
दोंडाईचा येथील कोवीड केअर सेंटर हे देखील अनेक तक्रारी गेल्यानंतर सुरू करण्यात आले. रूग्णांना दिला जाणारा आहार हा देखील अत्यंत निक्रुष्ठ दर्जाचा आहे. या सर्व कठीण परिस्थितीत ह्या महान कोवीळ योद्धानी महाराष्ट्र शासनाने दिलेले व्हॅटीलेटर सारखे अत्यंत आवश्यक उपकरणे देखील आजपर्यंत कार्यान्वित न करता नागरिकांच्या जीवाशी खेळ केला. त्यामुळे अनेक करोना बाधितांना आर्थिक, मानसिक त्रास भोगावा लागला व आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीला सुद्धा याच हलगर्जीपणामुळे मुकावे लागले.
आपत्ती व्यवस्थापक सुदाम महाजन यांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यात सुसंवाद निर्माण करून योग्य ते कार्य करणे अपेक्षित होते. पंरतु सुदाम महाजन यांनी आकस बुद्धीने राजकीय दबावापोटी प्रेरित होऊन उलट डाॅक्टरांमध्ये वाद निर्माण करून डॉक्टरांच्या तक्रारी करून व त्या करण्यास भाग पाडून रूग्णालय अंतर्गत वाद निर्माण करून आरोग्य सेवेस हानी पोहचविण्याचे काम केले. ऐकीकडे अनेक रूग्ण करोना आजाराने तडफडून जीव गमावत असताना आपले आपत्ती व्यवस्थापक मात्र कुठल्यातरी अंमलात स्वताच्या प्रसिद्धीसाठी व्हीडिओ गाणी बनविणे व बातम्या छापून आणण्याच्या कामात गुंतले होते.
दोंडाईचा शहर व परिसरात कोवीळच्या महामारी काळात वाखाणण्याजोगे काम ज्यांनी ज्यांनी केले आहे. त्यात काही डॉक्टर्स आणि दोंडाईचा पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री पंजाबराव राठोड व त्यांचे सहकारी आणि नगरपालिकेचे तृतीय व चतुर्थ कर्मचारी यांनीच अत्यंत प्रामाणीकपणे निष्ठेने काम केले. त्यांचे आभार देखील मानले पाहिजे. तसेच शेवटी समस्त दोंडाईचाकरांकडून अपेक्षा बाळगत कडक कार्यवाहीची मागणी केली आहे.
कोवीड -१९ प्रमुख तहसीलदार सुदाम महाजन यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्रीपर्यंत तक्रार
Posted by Buland Police Times on Friday, September 18, 2020
शासकीय यंत्रणेवर कडक कार्यवाही करण्याची दोंडाईचा शिवसेनेची मागणी
गाव व परिसरात करोना रुग्णांच्या संख्या उद्रेकास कारणीभूत असलेल्या शासकीय यंत्रणेवर कडक कार्यवाही करण्याची दोंडाईचा शिवसेनेची मागणी
Posted by Buland Police Times on Friday, September 18, 2020




