डोंगरगांव रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम ठरतंय डोकेदुखी

भाजप कार्यकर्त्यांची आक्रमक कारवाई

शहादा( विजय निकम) – शहरातील डोंगरगाव रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने रहदारीला अडथळा निर्माण होत रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याकारणाने त्याचा त्रास नागरिकांनारस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याकारणाने त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.पावसाळ्याच्या काळात या काँक्रीट करण्याचे काम सुरू असल्याने जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे म्हणून अखेर भारतीय जनता पार्टीच्या शहादा शहर टीमने डोंगरगाव रस्त्याच्या कामाबद्द्ल नाराजी व्यक्त करत इंजिनीयरला चांगलेच धारेवर धरले आहे .
रस्त्याच्या एका बाजूला काम चालु असतांना दुसरी बाजू रहदारीसाठी खुली आहे, परंतु रहदारीच्या रस्त्यावर वाहन चालवितांना फार कसरत करावी लागत आहे .पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व चिखल असल्यामुळे अलीकडे या रस्त्याने छोट्या-मोठ्या अपघाताचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे. या रस्त्याने वाहनचालकांची मार्गक्रमण करतांना चांगलीच दमछाक होत आहे. हॉटेल रेसिडेन्सी ते बिरसा मुंडा चौका पर्यंत या रस्त्यावर अनेक महत्त्वाचे दवाखाने असल्याकारणाने रुग्णांना देखील तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
डोंगरगाव रस्ता हा शहरातील अतिशय व्यस्त असा रस्ता असल्याकारणाने येथे वाहनांची नेहमीच वर्दळ असते. अशा अनेक समस्या जनतेसमोर असल्याकारणाने भाजपा शहर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जाऊन रस्ता सुपरविजन करणारे इंजि. यांना फ़ोन केला असता त्यांनी तात्काळ असि.इंजी. यांना पाठविले. भाजपा कार्यकर्त्यांनी असि. इंजी.ला चांगलेच धारेवर धरले आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे असे त्यांना सांगण्यात आले. यावेळी भा.ज.पा.मा.जिल्हा उपाध्यक्ष जीतू जमदाडे, शहर महामंत्री हितेंद्र वर्मा, युवाध्यक्ष राजीव देसाई यांनी असि.इंजी. यांना प्रत्यक्ष जागेवरच्या अडचणी दाखविल्या म्हणून दोन दिवसात आपण केलेल्या तक्रारींचे समाधान केले जाईल असे इंजी.यांनी आश्वासन दिले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या या कामाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here