शहादा नवजीवन प्लसतर्फे प्रथम वर्धापनदिनानिमित्त एक लिटर पेट्रोल मोफत

navjeevan-plus-petrol-free-yojana

शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) : ग्राहकांच्या फायद्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण योजना आणणाऱ्या नवजीवन प्लसच्या शहादा स्टोअर्सच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त इंडियन ऑईलच्या स्वस्तिक पेट्रोलपंपाच्या संयुक्त विद्यमाने एक खास योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत १५०० रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना १ लिटर पेट्रोल मोफत देण्यात येत आहे. भारतात प्रथमच पेट्रोल फ्री देण्याच्या नवजीवन प्लसच्या नावीन्यपूर्ण योजनेला ग्राहकांनी उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद दिला असून, ही अनोखी योजना राबविल्याबद्दल नवजीवन प्लसचे आभारही मानले आहे.

जळगाव जिल्ह्यात ग्राहकांना प्रथमच खरेदीचे स्वातंत्र्य देणाऱ्या नवजीवन प्लस सुपरशॉपने १९ जून २०२१ रोजी शहरात आपल्या स्टोअरची सुरुवात केली. सुपरसेव्हर संडे, स्पेशल शनिवार यासह खास बचतीच्या ऑफर देणाऱ्या नवजीवन प्लसतर्फे प्रथम वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी खास योजना जाहीर करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात अनेक ग्राहकांनी या योजनेला उदंड प्रतिसाद देत पेट्रोल फ्री मिळविले आहे.

शहादा स्टोअरमध्ये सुरु असलेल्या या योजनेत १५०० रुपयांच्या खरेदीवर मिळालेले कुपन इंडियन ऑईलच्या स्वस्तिक पेट्रोलपंपावर दिल्यानंतर १ लिटर पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे ही योजना दि. १९ जून ते २५ जून पर्यंत असून, पेट्रोल फ्री कुपन दि. ३० जून पर्यंत वापरता येणार आहे. पेट्रोल फ्री योजनेसोबतच दि. १९ जून ते दि. २५ जून शहादा स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला एक भेटवस्तूही देण्यात येणार आहे. प्रथम वर्धापनदिनानिमित्त जाहीर केलेल्या या योजनेला प्रतिसाद देत ग्राहकांनी निश्चितच लाभ घ्यावा, असे आवाहन नवजीवन प्लसतर्फे ललित चोरडिया यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here