शहादा येथे महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे अनावरण

शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) : येथील जुना मोहीदा रस्त्यावर श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ श्री महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वाभिमानाचा आपल्या विचारांना तडा जाऊ दिला नाही असे राजे महाराजे होऊन गेलेत.समाजाच्या उद्धारासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेत. त्यांचे महान कार्य त्यांच्या विचारातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे महापुरुषांचे स्मारक प्रेरणादायी असते. उभारलेल्या स्मारकातून त्यांचे आचार विचार व प्रेरणा नागरिकांनी घ्यावी असे आवाहन आमदार जयकुमार रावल यांनी केले शहादा येथील जुना मोहीदा रस्त्यावर श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ श्री महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते

यावेळी शहादयाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील अध्यक्षस्थानी होते. सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, महावीरसिंग रावल, देवेंद्रसिंग रावल, अरुण चौधरी, श्यामभाऊ चौधरी प्रा. मकरंद पाटील, सुरेश नाईक, बापु जगदेव, रविंद्र राऊळ, रविंद्र जमादार, प्रा. सजय राजपूत, अरविंद कुवर, सुपडू खेडकर, ऍड. स्वर्णसिंग गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे

यावेळी प्रवासा दरम्यान आलेल्या खड्डयांच्या अनुभवाचे कथन माजी पालक मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या भाषणा दरम्यान केले ते म्हणाले प्रवासादरम्यान रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता समजत नव्हते विद्यमान पालक मंत्री जिल्हयाचे सुपुत्र आहेत त्यांनी विकास कामांचे निधी बरोबर रस्त्यांकडेही लक्ष दयावे असा खोचक टोला लगावला. आपण पालकमंत्री असतांना जिल्ह्याच्या विकासात कधीही खिळ बसु दिला नाही. वेळोवेळी प्रत्येक भागात निधी दिला. यावेळी कोमलसिंग गिरासे, अभिजीत पाटील, दिपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजपुत समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा. संजय राजपूत यांनी केले. यावेळी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here