जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात अंतर्गत असलेल्या इच्छादेवी पोलिस चौकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याहस्ते करण्यात आले.
एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजच्या सहकार्याने नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. असून मंगळवार (दि. २१) रोजी या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड, स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे सीईओ दिपक चैधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यांच्यासोबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, गिरासे सर, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंद सिंह पाटील, गोपनीय विभागचे बोरसे सर, पो.ना सैय्यद इम्रान, पो.हेकॉ नितीन पाटील, पो.का इम्रान बैग, पो.का गोविंदा पाटील, हे.कॉ अल्ताफ पठाण, पो.का सुधीर साळवे, पो.का नाना तायडे, पो.का मुद्द्सर काझी, वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.







