एरंडोलमध्ये काँग्रेसतर्फे ‘संविधान बचाव, लोकशाही वाचवा’ जनजागृती अभियान उत्साहात

काँग्रेस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेश आणि जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी भालेराव यांच्या सूचनेनुसार, एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात ‘देश वाचवा, मत वाचवा, लोकशाही वाचवा, संविधान बचाव’ जनजागृती व जनसंपर्क अभियान राबविण्यात आले.

 

या अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राज्य उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब विजय महाजन यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून देशातील लोकशाही मूल्ये, संविधान रक्षण आणि मतदारांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी जनसंपर्क करण्यात येत आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एरंडोल तालुकाध्यक्ष श्री. सुनील गोविंदा पाटील व शहराध्यक्ष श्री. संजय भदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या अभियानाप्रसंगी पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ‘बुलंद पोलीस टाईम’चे संपादक श्री. सुनील पाटील, जिल्हा सचिव श्री. अनवर दादा मिस्तरी, ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी श्री. कमर अली दादा सय्यद, कासोदाचे माजी शहराध्यक्ष श्री. सुरेश पवार, जिल्हा सचिव ॲड. हिम्मतराव पाटील, जिल्हा सचिव श्री. सागर पाटील (निपाने), महिला तालुकाध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी श्री. शेख सांडू दादा, एनएसयूआय धरणगाव तालुकाध्यक्ष श्री. हेमंत पाटील, इंटक तालुकाध्यक्ष श्री. रईस दादा शेख, कासोदा शहराध्यक्ष श्री. शेख मुजम्मिल, तालुका उपाध्यक्ष श्री. मधुकर धनराज पाटील, तालुका सचिव श्री. सूर्यभान अण्णा पाटील, तालुका सरचिटणीस श्री. झुंबर सिंग दादा पाटील, युवक काँग्रेस शहराध्यक्ष श्री. जहांगीर शेख, तालुका सरचिटणीस डॉ. प्रफुल रायसिंग, तसेच श्री. राकेश भाऊ चौधरी (एरंडोल), श्री. सुभाष भाऊ चौधरी (एरंडोल), श्री. पप्पू पाटील (भवरखेडे) आणि श्री. मिलिंद पवार (सोनबर्डी) यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here