भाजपा ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते अनिल महाजन यांनी विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांना लिहले महत्वाचे पत्र

प्रति
मा.देवेंद्रजी फडणवीस जी
विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपणास एक भाजपाचा ओबीसी कार्यकर्ता म्हणून पत्र लिहतो की,आपण आमच्यासाठी वंदनीय आहात. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमात आपण जे व्यक्तव्य केलं ते अतिशय योग्य आहे. शिवसेनेसोबत युती केली नसती तर १५० च्या वर विधानसभेच्या जागा आल्या असत्या १००% खर आहे साहेब.
चला उशिरा का असेना आपल्याला आदरणीय माजी मंत्री एकनाथ खडसे साहेबांनी केलेले व्यक्तव्याची जाणीव झाली हाच शब्द काही दिवसा आगोदर एकनाथ खडसे साहेबांनी सांगितलं होता चला उशिरा का होईना खडसे साहेबांचा शब्द आपण मान्य केला त्या बद्दल आपले आभार.
फडणवीस साहेब अजून ही वेळ गेलेली नाही एकनाथ खडसे साहेब अनुभवी दिगग्ज हाडमासाचे सामान्य कार्यकर्त्यांचे नेते आहेत आणि दिलदार व्यक्ती आहेत मोठ्या मनाचे आहेत एका झटक्यात मागील विषयावर पडदा टाकणारे आहेत.
फडणवीस साहेब तुम्ही अल्पसंख्यांक,एकनाथ खडसे साहेब अल्पसंख्याक आहेत. आपणच एक दुसऱ्याला सांभाळे पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री झालात ते तुमच्या नशिबात होते ते आपल्या कडून कोणीही हिसकाऊ शकत नाही होते सर्व गोष्टी ह्या नशिबावर अवलंबून असतात.
साहेब पुढे रस्ता खूप कठीण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा पक्षात प्रवेश केला आहे
पवार मामा खतरनाक रणनीती आखत आहेत उद्धव बाबा सत्तेची दोरी कशी पक्की करता येईल ते बघत आहेत काँग्रेस ऑक्सिजन घेऊन घेऊन जीव वाचवण्याचा पर्यंत करत आहेत त्यांचे नेते जसे आले तसे काम झोडपत आहेत
एकनाथ खडसे साहेबांची सामान्य कार्यकर्त्या सोबत नाळ जुडली आहे.ते आपण ओळखावे दिलदार व्यक्तीमत्व आहेत खडसे साहेब त्यांची नाराजी दूर करा त्यांना न्याय द्या पक्षाशी प्रामाणिक आहेत ते अशी माझ्या सह असंख्य कार्यकर्त्यांची मागणी आहे.
फडणवीस साहेब आपण कालच म्हटले मी ब्राह्मण समाजाचा आहे म्हणून काही प्रस्थापित लोक मला टार्गेट करत आहेत.
फडणवीस साहेब जेव्हा एकनाथ खडसे साहेबाना ओबीसी समाजाचा नेता आहे म्हणून आपल्याच स्वपक्षीय काही लोकांन कडून ओबीसी आहे म्हणून वेगवेगळ्या छुप्या मार्गाने टार्गेट केले गेले तेव्हा आपण त्या लोकांना का? बोलले नाहीत खडसे साहेब यांच्या पाठीशी आपण उभे का? राहिले नाही तेव्हा. साहेब जशा आपल्याला आता वेदना होत आहेत तशाच एकनाथ खडसे साहेबाना ही वेदना अजूनही होतच आहेत ना.
फडणवीस साहेब आपण जे पेरणार तेच उगणार आहे अशी सर्व सामान्य जनता मध्ये चर्चा रंगली आहे
साहेब मी भाजपा ओबीसी मोर्चाचा लहानसा कार्यकर्ता आहे. मी आपल्याला काही सुचवणे इतका मी मोठा नाही पण गावपातळीवर सामान्य लोकांन मधील चर्चा ही आपल्या कानावर पोहचली पाहिजे.
आज आपण जे सांगितले शिवसेना सोबत युती करून चूक झाली त्या बाबत तशा अनेक गोष्टी ह्या एकनाथ खडसे साहेबांनी आगामी धोका लक्षात घेऊन अगोदरच आपल्याला सर्वाना सूचित केले आहेत. त्यातील ही पहिली गोष्ट आहे. हळू हळू त्या सर्व गोष्टी आपणच आपल्या शब्दातून मान्य कराल साहेब राजकारणात कोणाची वेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही आणि कुठला पक्ष कधी सत्तेवर येईल आणि कोणता पक्ष कधी विरोधात राहील हे आज काहीही सांगता येत नाही कारण कॉपी करून पास होणाऱ्या विद्यार्थीची संख्या वाढली आहे
माझे पत्र आपण नक्की वाचला अशी अपेक्षा करतो
आपलाच
भाजपा ओबीसी मोर्चा कार्यकर्ता अनिल बा. महाजन मुबंई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here