कुऱ्हा पानाचे आजपासून तीन दिवस बंद

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – कु-हे ( पानाचे ) गावामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवार रोजी शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोदभाऊ सावकारे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार , ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाषदादा पाटील , माजी उपसरपंच डॉ. टी . टी. बारी , लोकमतचे पत्रकार उत्तम काळे , माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे , किशोर वराडे , सुनील बारी , राजूभाऊ भगत , विलास चौधरी , गोकुळ वराडे , डॉ. संदीप टोगळे यांच्यासह काही नागरिक व मित्र मंडळ यांनी बैठक घेऊन गाव शनिवार , रविवार व सोमवार असे तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे .
त्याचप्रमाणे गावात टॅंकरद्वारे फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी गाव बंदच्या निर्णयामध्ये सहभागी व्हावे , असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here