आज आढळले ७४२ कोरोनाबाधित; १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींचा स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.१९) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात आज ७४२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जळगाव शहरासह पारोळा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे.
आज आढळलेल्या ७४२ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर-१९६, जळगाव ग्रामीण-१०, भुसावळ-६०, अमळनेर-५६, चोपडा-५८, पाचोरा-१०, भडगाव-२, धरणगाव-४३, यावल-२१, एरंडोल-७, जामनेर-२५, रावेर-२३, पारोळा-११५, चाळीसगाव-६४, मुक्ताईनगर-१८, बोदवड-२४ व दुसर्या जिल्ह्यांमधील १० असा समावेश आहे.
आज आढळलेल्या ७४२ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार ३०१ झाली असून, आजवर ३२ हजार ३३६ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान आज कोरोनामुळे १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकुण आकडा १०८० इतका झालेला आहे. सद्यस्थितीत ९ हजार ८८५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







