पुणे (प्रतिनिधी नारायण शेळके) – पुण्यात हडपसर पोलिसांनी १८ गावठी बनावटीचे पिस्टल आणि २७ जिवंत काडतुसे जप्त केले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. अरबाज खान, सूरज चिंचणे,कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव अशी सहा आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून १८ बनावट पिस्टल, २७ जिवंत काडतुसे, एक चोरीची मोटार सायकल असा एकूण मिळून ५ लाख ६८ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे यामुळे पुणे शहरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याचे कारस्थान घडले असते. यामुळे अजून या आरोपींकडून अनेक माहिती मिळण्याची शक्यता आहे. यातील अनेक आरोपींवर अगोदरही गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता ? कोणाला दिला जाणार होता ? की काही घात पात करायचा होता याचा तपास हडपसर पोलिस करत आहेत.







