कन्नडमध्ये कटरच्या सहाय्याने एटीएम कापून दोन लाख ३५ हजार रुपये लुटले

atm-loot

कन्नड (क्राइम रिपोर्टर प्रदीप मोरे) : शहरामध्ये एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून दोन लाख ३५ हजार रुपये लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. ११ ) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडला आहे.

 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कन्नड शहरातील चाळीसगाव रोडवरील हिवरखेडा टी पॉईट येथे इडिया वन कंपनीचे एटीएम मशीन आहे. या ठिकाणाहुन नागरीक मोठ्या प्रमाणावर व्यवहार करतात. रविवारी पहाटे चोरट्यांनी पहाटे हे एटीएम कटरच्या सहाय्याने फोडून दोन लाख ३५ हजार ६०० रुपये लंपास केले.

 

कन्नड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजीव तळेकर पोलिस उप निरीक्षक भुषन सोनार यांनी घटनास्थळी भेट दिली असून इंडिया वन एटीएमचे वितरक पारस छाजेड यांच्या फिर्यादीवरून अजात व्यक्ती विरुद्ध कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास कन्नड शहर पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here