मुंबई (निवासी संपादक ॲड.सुभाष अंकुश आरोसकर) : आज ४९ व्या राज्य जुडो चॅम्पियनशिप आणि नॅशनल चॅम्पियन ट्रायल स्पर्धा कोल्हापुर येथे आयोजित करण्यात आली होती, त्यात ७३ किलो वजनी गटात मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा आयुष फाळके यांनी सलग ५ फेर्या जिंकून कोल्हापुरात मुंबईचा झेंडा फडकावला.व सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय भोसले यांनी आयुष ला सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले आणि तांत्रिक सचिन श्री दत्ता आफळे यांच्या शुभ हस्ते संपूर्ण स्पर्धेचे बेस्ट जुडोका ही मानाची ट्रॉफी देऊन त्याला गौरविण्यात आले

आयुष हा खालसा कॉलेज ला बिएमएस च्या दुसर्या वर्षात शिकत असून दादरच्या समर्थ व्यायाम मंदिर येथे प्रशिक्षक इंटरनॅशनल जुडो रेफ्रि रविन्द्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत असून आता पुढील आठवड्यात रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आयुष फाळके हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.







