मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात बेवारस मयत पुरुषाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस शोधपत्रिका जारी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ५५ वर्षे वयाचा एक पुरुष २४ ऑगस्ट २०२६ रोजी कांदिवली पूर्व, मुंबई परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आला होता. उपचारादरम्यान २५ ऑगस्ट २०२६ रोजी शताब्दी हॉस्पिटलमध्ये या मयत व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक १५३/२०२६ (कलम १९४, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ नुसार) नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
सदर मयत इसमास कोणी ओळखत असल्यास, किंवा त्याच्या नातेवाईक, मित्रपरिवाराबाबत, राहण्याच्या ठिकाणाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक नवनाथ शिंदे, समता नगर पोलीस ठाणे, कांदिवली पूर्व, मुंबई, मोबाईल क्रमांक: ९८८१३६४५३५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







