धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड; पत्रकार संघातर्फे जल्लोष व अभिनंदन

धुळे जिल्हा मराठी पत्रकार

धुळे (उपसंपादक प्रशांत सूर्यवंशी) । धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची फेररचना नुकतीच पार पडली असून, यामध्ये विविध पदांवर नव्या चेहऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल पत्रकार वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री. भाऊसाहेब प्रदीप जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच संघाच्या उपाध्यक्षपदी सौ. शोभाताई आखाडे, सचिव पदी श्री. प्रकाश चव्हाण आणि खजिनदारपदी सौ. सुवर्णाताई टेंबेकर यांची निवड झाली आहे. याशिवाय, मुंबई प्रतिनिधी म्हणून श्री. जसपालसिंह सिसोदिया सर यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीसोबतच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी श्री. रोहिदास हाके, श्री. तव्वाब अन्सारी, श्री. दत्ता बागुल, श्री. जितेंद्र खैरनार, श्री. विजय पाठक, श्री. रविंद्र शिंदे, श्री. प्रमोद झालटे, श्री. जॉनी भाई पवार, श्री. रिखबचंद लोढा, श्री. जितेंद्रसिंह राजपूत, श्री. दिनेश विभाडिक यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या आगामी कार्यकालारूढीसाठी आणि पत्रकार हिताच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.धुळे जिल्हा मराठी पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here