शिरपूर तालुक्यात पोलीस व वनविभागाची संयुक्त धडक कारवाई; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जागीच नष्ट

शिरपूर

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) | धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वनविभागाने एका अत्यंत दुर्गम भागात संयुक्त छापा टाकून तब्बल ७ कोटी ६८ लाख रुपये किमतीचा ३,०७२ किलो गांजाचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

१ सप्टेंबर २०२६ रोजी जामन्यापाणी वनक्षेत्रालगतच्या परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी कॅनाबीस वनस्पतीची (गांजाची झाडे) अवैध लागवड केल्याची गोपनीय माहिती वनविभाग आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. दुर्गम भाग असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा वाहून आणणे शक्य नसल्याने, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तिथेच इन्व्हेंटरी करून मुद्देमाल नष्ट करण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

शिरपूरया माहितीच्या आधारे २ सप्टेंबर २०२६ रोजी शिरपूर तालुका पोलीस व वनविभाच्या पथकाने भोरखेडा, रोहिणी आणि खंबाळे या अति दुर्गम भागातील एकूण ९० गुंठे क्षेत्रावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान विशेष कार्यकारी दंडाधिकारी, दोन शासकीय पंच, वजनकाटा धारक, फोटोग्राफर आणि राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत कारवाई करत एकूण ३,०७२ किलो वजनाची आणि ७ कोटी ६८ लाख रुपये किमतीची गांजाची उभी झाडे जागीच नष्ट करण्यात आली. याशिवाय, १० गुंठे क्षेत्रातील १०० किलो गांजाची झाडे पुढील कायदेशीर प्रक्रिया व सोपस्कारांसाठी जप्त करण्यात आली आहेत.

सदर कारवाईदरम्यान हुकला भिकला पावरा (रा. खंबाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) या आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून त्याच्याकडे वनपट्टा क्रमांक प्राप्त झाला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, सहायक वनसंरक्षक राहुल घरटे यांच्या उपस्थितीत आणि कार्यकारी दंडाधिकारी महेश साळुंखे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, वन परिक्षेत्रीय अधिकारी विशाल दुसाणे यांच्यासह पोलीस व वनविभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.शिरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here