जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | कवयत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट २०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर (Clock Hour Basis) निर्देशकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंबंधीची नोटीस संस्था प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
सदर व्यवसायातील शैक्षणिक पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती आणि अर्जासह दिनांक ०७/१०/२०२६ (बुधवार) रोजी सकाळी ११:०० वाजता लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी केले आहे.
TDM (J&F): ०१ पद, PPO: ०१ पद, यांत्रिक डिझेल (Diesel Mechanic): ०१ पद, यांत्रिक मोटारगाडी (Motor Mechanic): ०१ पद, फाउंड्रीमन (Foundryman): ०१ पद या रिक्त पदांसाठी या मुलाखती आहेत. मुलाखतीसाठी किंवा परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पात्र व इच्छुक उमेदवारांनी वेळेસ उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







