ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे सतीश गायकवाड यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड

ऑल इंडिया पँथर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने सामाजिक आणि संघटित क्षेत्रातील कार्याचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मान्यतेने आणि आदेशानुसार पँथर सतीश गायकवाड यांची ‘उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष’ पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

 

दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हे नियुक्ती पत्र जारी करण्यात आले असून, या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रात संघटनेचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. शिव, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालून संघटनात्मक व आंदोलनात्मक भूमिका घेत शोषित, पीडित तसेच वंचितांच्या न्याय हक्काचा लढा अधिक तीव्र करावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी या नियुक्तीप्रसंगी व्यक्त केली आहे.

पँथर सतीश गायकवाड यांच्या या नूतन निवडीबद्दल विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसशुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here