जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव महानगर शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि कार्याध्यक्ष राजूभाऊ मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जळगाव जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन सर यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते लागू झाले, म्हणूनच संपूर्ण भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले हे संविधान सर्व नागरिकांना मूलभूत हक्क देण्यासोबतच कर्तव्याचीही जाणीव करून देते. न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता ही संविधानातील त्रिसूत्री प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी केले. याप्रसंगी प्रा. जयप्रकाश महाडिक, किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, राजूभाऊ बाविस्कर, विशालभाऊ देशमुख यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here