
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शरद चव्हाण) | रावसाहेब रूपचंद विद्यालयात गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये, मूलभूत हक्क आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गिरीश. आर. भावसार होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संविधान पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपशिक्षक के. जे. सोनवणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व, संविधान निर्मितीचा इतिहास, मूलभूत तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संविधानाची प्रार्थना व शपथ देण्यात आली. तसेच संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त एनसीसी विभाग प्रमुख गिरीश महाजन यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याची माहिती देत त्यांच्या बलिदानाला उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामूहिक संविधान वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयाशू पोळ सर यांनी केले
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक गिरीश. आर. भावसार, शिक्षक एस. आर. पिले, वाय. जी. चौधरी, डी.टी.पाटील, जयांशू पोळ, आर.बी.महाजन. दिवाकर साबळे, दिलीप पाटील,डी.डी.जोशी, बी. क्षीरसागर, पी. आर. श्रावगी, एम. एन. खडसे, सी. एन. पाटील, एल. पी. तायडे मॅडम, एनसीसी विभाग प्रमुख गिरीश महाजन,सा.का.समिती प्रमुख एम.एन.खडसे, एम.पी.बर्हाटे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.







