शिरपूर तालुक्यात पोलिसांची धडक कारवाई: १ कोटी ५२ लाखांचा गांजा जप्त

शिरपूर

शिरपूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर पवन मराठे) | शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका डोंगराळ भागात बेकायदेशीरपणे लावली गेलेली १ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये किमतीची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी शिरपूर तालुक्यातील आंबाफाटा गावाच्या पुढील बाजूस असलेल्या डोंगराळ भागातील वनपट्टयाच्या जमिनीवर काही अज्ञात व्यक्तींनी प्रतिबंधित कॅनाबीस (गांजा) वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस पथकाने पंचांसमक्ष संबंधित जागेवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान वन परिक्षेत्रीय अधिकारी, वजनकाटाधारक, फोटोग्राफर आणि फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली.

यावेळी  मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या कॅनाबीस (गांजा सदृश्य) वनस्पतीची उभी पिके/झाडे ६१० किलो वजनाचा, एकूण १,५२,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गु.र.नं. ४८१/२०२६, एनडीपीएस (NDPS) कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २२(क) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर धडक कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक वर्षा पाटील व पोलीस अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here