केतकी प्रकाशन दिवाळी अंक – २०२६ प्रकाशन व मान्यवरांचा भव्य जीवनगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

केतकी प्रकाशन

मुंबई (संपादक सुनिल पाटील) | केतकी प्रकाशन प्रा. लि. च्या वतीने आयोजित अक्षरांचा दैदिप्यमान उत्सव ‘केतकी दिवाळी अंक – २०२६’ चा भव्य प्रकाशन सोहळा आणि समाज, साहित्य, शिक्षण, कला, विधी व संस्कृती क्षेत्रात अथांग योगदान देणाऱ्या २३ महनीय व्यक्तींचा ‘जीवनगौरव पुरस्कार सोहळा’ शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई पत्रकार संघ, दुसरा मजला सभागृह हॉल (आझाद मैदान जवळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई) येथे संध्याकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला.

 

या सोहळ्याच्या अध्यक्षा म्हणून प्रसिद्ध समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेविका व कवयित्री डॉ. अलका नाईक (मुंबई) या लाभल्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख तथा प्रसिद्ध लोककलावंत प्रा. डॉ. गणेश एस. चंदनशिवे उपस्थित होते. केतकी प्रकाशन प्रा. लि. चे संचालक व ‘जनमत मंच’चे संपादक श्री. चंद्रकांत धर्माजी जाधव आणि कार्यकारी संपादक व साहित्यिक श्री. गजानन म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे सहर्ष स्वागत केले.

या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील २३ लखलखत्या ताऱ्यांचा त्यांच्या विशेष योगदानाबद्दल व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. जे. एन. कुरुप (Lifetime Educational Visionary Award), डॉ. वसंतराव तुकाराम पाटील (मानसशिल्पी शिक्षण गौरव पुरस्कार), श्री. आर. व्ही. सिंग (शैक्षणिक क्रांती पुरोधा सन्मान), श्री. दिलीप शंकरराव पाटील (विद्यावैभव विधी-रत्न पुरस्कार), Mrs. Rachita Burman (Best Institutional Leadership Award), डॉ. सौ. अलका भरत नाईक (केतकी तेजस्वीनी स्त्री-शक्ती जीवनगौरव पुरस्कार), श्री. गुलाबराव शिंदे (छात्र-हितैषी जीवनगौरव पुरस्कार), ॲड. उज्ज्वल निकम (केतकी राष्ट्रसेवा गौरव पुरस्कार), श्री. राकेश सिंग (शिक्षा शिरोमणी सन्मान), श्री. संतोष सिंग (ज्ञानसूर्य जीवनगौरव पुरस्कार), श्री. योगेशचंद्र डी. लोहोकरे (जनसंवाद जीवनगौरव पुरस्कार), श्री. रवींद्र उखा पाटील (शिवसंस्कृती गौरव पुरस्कार), डॉ. मंदार पनेलकर (क्रीडा संघटक जीवनगौरव पुरस्कार), डॉ. गोरखनाथ अंजना महादेव पोळ (शिक्षण, साहित्य – समाजसेवा जीवनगौरव पुरस्कार), डॉ. अनंता धरणेकर (Visionary Educational Leadership Award), डॉ. संजय रहाटे (Career Visionary Award), श्री. दीपक पाटील (कला-साधना जीवनगौरव सन्मान), कु. खुशी संजय रहाटे (Ketaki Young Author Award), श्री. प्रथमेश नंदकुमार मळईकर (Emerging Author Of The Year Award), श्री. बाळकृष्ण निवृत्ती आठवले (विद्या कल्पतरू जीवनगौरव पुरस्कार), सौ. मंजिरी पाटील (विद्यालक्ष्मी पुरस्कार), डॉ. गणेश चंदनशिवे (केतकी लोकसंस्कृती गौरव पुरस्कार) आणि Mrs. Yasmeen Usman Shaikh (Visionary Academic Leadership Award) या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. गणेश एस. चंदनशिवे यांनी केतकी प्रकाशनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे व वाचन संस्कृती जोपासण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अलका नाईक यांनी समाज आणि साहित्याच्या या मंगलमयी संगमाचे महत्त्व अधोरेखित करत सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन केतकी प्रकाशन परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, या सोहळ्याला मुंबई व परिसरातील साहित्यिक, वाचक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here