पारोळा पोलिसांनी चोरीस गेलेला कापूस व मोटरसायकल जप्त करून फिर्यादीस केला परत

parola-police

पारोळा (प्रतिनिधी) : फिर्यादी नामे रामसिंग आधार गिरासे रा बोळे यांचे शेतात वेचून ठेवलेले 50/50 किलोचे -2 कापसाचे गाठोडे किंमत 9500/-रुपये किमतीचे आरोपी नामे 1)विशाल नामदेव पवार 2)रवींद्र नगराज कोळी दोन्ही रा शिरूड ता जी धुळे यांनी त्यांची मोटर सायकल वर घेऊन पळून जात असतांना रंगेहात पकडले होते,दोन्ही आरोपींना अटक करून दोन्ही कापसाचे 1 क्विंटल वजनाचे कापूस जप्त केले होते.

 

पारोळा बस स्टँड येथून फिर्यादी ज्ञानेश्वर रमेश बुंधे रा पारोळा यांची हिरो डिलक्स MH 19 क 4245 अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत पारोळा पी स्टे येथे फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला होता,तपासात मिळालेले गुप्त बातमीवरून निंभोरा पोलिसांचे मदतीने आरोपी नामे विभोर जुलाल जाधव रा जवखेडा ता एरंडोल यास व त्याचे सोबत नमूद मोटर सायकल चोरी करणारा प्रवीण संभाजी पाटील रा ब्राह्मणे ता एरंडोल असे दोघांनाही अटक करून चोरी केलेली वरील मोटर सायकल जप्त करण्यात आली असून मा श्री के के माने JMFC कोर्ट पारोळा यांचे आदेशावरून कापूस व मोटरसायकल फिर्यादिस परत करण्यात आला आहे.

 

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना योगेश जाधव,पो ना प्रदीप पाटील,पो कॉ किशोर भोई,पो कॉ राहुल कोळी,पो कॉ अभिजित पाटील,पो कॉ आशिष गायकवाड,पो कॉ हेमचंद्र साबे,पो कॉ राहुल पाटील,पो ना संदीप सातपुते,महिला पो ना(कारकून) आम्रपाली पालवे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here