चिचाळा येथे शेतमजुर महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भिवापूर (क्राइम रिपोर्टर आकाश शेगये) : शेतात कामावर असलेल्या मजुर महिलेचा विनयभंग करणा-या शेतमालकाविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटना गत १४ डिसेंबरला चिचाळा येथे घडली.

घटनेच्या दिवशी पिडीत महिला ( वय ४५ वर्ष ) आरोपी सुरेश जोधरु पडोळे रा. चिचाळा याच्या शेतात हरभरा निंदायला मजुरीने गेली होती. सायंकाळी चारच्या सुमारास एकांताचा लाभ घेत आरोपीने तीच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेने प्रतिकार करीत त्याच्या तावडितून कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. या घटनेनंतर ती तनावात होती. काही दिवसांनी घडलेला प्रकार तीने कुटूंबियांना सांगितला.

कुटुंबियांच्या मदतीने सोमवारला ( दि. २७ ) ला भिवापूर पोलीस ठाणे गाठून तीने घटनेची तक्रार नोंदवली. तीच्या तक्रारीच्या आधारावर आरोपी सुरेश पडोळे विरुद्ध भादवीच्या ३५४, ३५४ ( अ ) कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ठानेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात हेड काँन्सटेबल दुर्गा शंभरकर पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here