जळगाव (क्राइम रिपोर्टर रजत शेख) : संपकरी एसटी कर्मचा-यांना कामावर हजर होण्याचे अवाहन करुन देखील ते येत नसल्याचे दिसुन आले आहे. गेल्या सुमारे अडीच महिन्यापासुन राज्यात एसटी कर्मचारी संपात उतरले आहेत. राज्य शासनाच्या सेवेत सामावुन घेण्याची अर्थात महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची या कर्मचार्यांची मुख्य मागणी आहे.
जळगाव आगारातील ३५ चालक व ३५ वाहक कामावर हजर झाले असेल तरी त्यांची सेवा अतिशय तोकडी पडत आहे. राज्य शासनाने बस कर्मचार्यांच्या पगारवाढीसह इतर मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. यामुळे खासगी प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात फोफावली असुन खासगी प्रवासी सेवा देणा-या व्यावसायिकांची मात्र चांदी झाली आहे.
राज्य मार्ग परिवहन विभागाच्या जळगाव विभागातील अजुन २२ कर्मचा-यांना आज बडतर्फ करण्यात आले आहे. जळगाव आगरातील ८ व भुसावळ आगरातील १४ कर्मचा-यांना या बडतर्फीत समावेश आहे. आता पर्यंत एकुण ३५० कर्मचार्यंवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.






