पत्रकार मिलिंद जंजाळे यांना शेगाव येथे ‘राज्यस्तरीय कर्तव्य दक्ष पुरस्कार – २०२६’ प्रदान

कर्तव्य दक्ष पुरस्कार

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) | आरोग्य जनजागृती, समाजसेवा आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘राज्यस्तरीय कर्तव्य दक्ष पुरस्कार – २०२६’ वितरण सोहळा नुकताच पार पडला. संकल्प बहुउद्देशीय संस्था (पारस) व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था (तुळंगा बु.) यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीसंत गजानन महाराजांच्या पावन भूमी शेगाव येथे शनिवार, दिनांक १२ रोजी हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील साकळी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानपत्र, स्मृतिचिन्ह व ‘राज्यस्तरीय कर्तव्य दक्ष पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सिंदखेडराजाचे उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जंजाळे यांच्या कार्याचे कौतुक केले. व्यासपीठावर अध्यक्ष : महेंद्र डोंगरे (मुख्य संपादक – वंचितांचा प्रकाश), उद्घाटक : गजानन कांबळे (नगरसेवक), विशेष उपस्थिती : जीवन डिगी (समाजसेवक), ॲड. अजित शिरसाट (रुग्ण कल्याण समिती सदस्य), विशेष अतिथी अनिल खंडागळ पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी), श्रीमती प्रज्ञा पंडितकर काकडे (तहसीलदार, शेगाव), भीमराव लोणगरे (नागपूर). याशिवाय प्रकाशभाऊ शेगोकर (नगराध्यक्ष, शेगाव), सौ. वैशालीताई सुनुळे (उपाध्यक्ष, नगर परिषद), सौ. सीमा ओंभे, सौ. सरलाताई काळे, अभिनेत्री संध्या संदीप चव्हाणकर, शीतलताई शेगोकर, डॉ. प्रा. समाधान कंकाळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार मिलिंद जंजाळे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि जनतेच्या समस्या सातत्याने प्रभावीपणे मांडल्या आहेत. विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी मोठे जनजागृतीचे कार्य केले आहे. त्यांच्या याच बहुआयामी कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नरेंद्र नवनीत इंगळे (संस्थापक अध्यक्ष, संकल्प संस्था), इंजि. सतीश देवचंद हातीले (संस्थापक अध्यक्ष, ग्रामीण युवा संस्था) तसेच सौ. प्रतीक्षा वास्निक (सचिव) यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊताई डोंगरे, सौ. कविता धनंकर, सौ. अलका गुल्हाणे, कु. स्नेहलता दामभाडे, सौ. मंगला सोनकेंडे, सौ. मिर्ना पाटील आणि सौ. संगीता सभागणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल साकळीचे लोकनियुक्त सरपंच दिपक पाटील, ग्रामस्थ, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मिलिंद जंजाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यस्तरीय सन्मानामुळे साकळी गावासह संपूर्ण यावल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here