रोहिणीताई खडसे यांच्या पाठीशी महाराष्ट्र माळी समाज महासंघ खंबीरपणे उभा आहे.- अनिल महाजन

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : रोहिणीताई खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला प्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई करा अन्यथा जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावर नुकताच काही समाजकंटकांनी मुक्ताईनगर येथे त्यांच्या वाहनावर दगडफेक करून हल्ला करण्यात आला आहे. एका महिलेवर हल्ला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हल्लेखोरांना कडक शासन व्हावे यासाठी राज्यभरात संघटन असलेले महाराष्ट्र माळी समाज महासंघा तर्फे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र देण्यात आले आहे.

mali-samaj-mahamandal

हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here