जनतेची लूट करून कुठला विकास दाखवताय; शिवसेना जळगाव महानगरतर्फे सरकारचा निषेध

शिवसेना

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | सर्वसामान्य जनतेची लूट करून महागाई वाढवून कुठला विकास दाखवताय असा सवाल शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने सरकारला करण्यात आला.

 

सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असून त्यात भर म्हणून शासनाने केलेली साखर दरवाढ ही जनतेची लूट असून महागाई वाढवून कुठला विकास दाखवायचा प्रयत्न करत आहे असा संतप्त सवाल  शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात  केला आहे.

साखर दरवाढी विरोधात आज शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने १७ मजली प्रशासकीय इमारतीसमोर जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात सदर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या वतीने बिना साखरेचा चहा तयार करून शासनाचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना  मनपा शिवसेना गटनेत्या अर्शिन खाटीक उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे तालुकाप्रमुख प्रमुख घुगे महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील गायत्री सोनवणे महिला आघाडी उपमहा नगर प्रमुख नीता सांगोळे माजी नगरसेविका पार्वता भील युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी उपमहा नगर प्रमुख गणेश गायकवाड प्रशांत सुरळकर भूषण जोशी विभाग प्रमुख किरण भावसार शोएब खाटीक कलीम खान शरीफ रंगरेज निलेश ठाकरे अमित जगताप बापू मेने हर्षल मुंडे तोसीफ काकर संजय सांगोळे सनी जैन प्रफुल नाईक प्रेमराज राठोड योगेश पाटील अशोक गिरणारे किरण ठाकूर प्रमोद सोनवणे डॉ. रमाकांत कदम अनिल राठोड महेश शेरे सावन राठोड संकेत चव्हाण ज्योती वंजारी मनीषा कोळी विजया पाटील सुजाता पाटील मनीषा कोळी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here