अपघातग्रस्त कर्मचाऱ्यास नुकसान भरपाई देण्यासाठी बेदमुथा इं.लि.नरडाणा येथे कार्यालयीन अधीक्षक गोळंबे यांना शिवसेनेतर्फे निवेदन

दोंडाईचा (संतोष कोळी) – शिंदखेडा तालुक्यात नरडाणा येथील बेदमुथा इ.ली.कंपनित वर्कर म्हणून काम करत असलेले म्हळसर गावातील संदीप रोकडे यांना कंपनीत कामावर असताना अपघात झाला. यात त्यांना अंशतः शारिरीक अपंगत्व आले आहे. त्याबद्दल त्यांना कंपनीने नुकसान भरपाई द्यावी यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी व छोटू पाटील यांनी कार्यालयीन अधीक्षक श्री.गोळंबे यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, संदिप दिलीप रोकडे हे लाॅजिस्टीक विभागात वर्कर म्हणून दिनांक १५/५/२०२० रोजी दुपारी ठिक ११:०५ वाजता काम करत असताना असताना लोखंडी बाॅबिन खाली पडून आली पाहता सुरेश रोकडे हे बाॅबीन ला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळी सुरेश रोकडे यानचे डाव्या हाताच्या करंगळी चे एक पेर व उजव्या हाताच्या बोटाचे दोन पेर कापले गेले असता कंपनीतील कर्मचारी व काॅन्ट्रक्टर ने सुरेश रोकडे यांना तात्काळ दवाखान्यात अॅडमिट केले त्यावेळी काॅन्ट्रक्टर ने सुरेश रोकडे यांची विनवणी केली की आपल्याला कंपनीत झालेल्या दुखापती बदल्यात पाहीजे ती भरपाई देण्यास कंपनी तयार आहे परंतु कंपनी विरोधात कुठलीही कारवाई करु नका त्यावेळी सुरेश रोकडे यांनी कसलीही आर्थिक मदत न मागता काॅन्ट्रक्टर यांना सांगितले की माझे दोन्ही हातांना दुखापत झाली आहे माझ्या कडून इतर ठिकाणी किंवा वजनदार काम करणे जमणार नाही त्यासाठी मला बेदमुथा कंपनित कायमस्वरूपी पर्मनन्ट करुन घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर काॅन्ट्रक्टर यांनी कंपनितील एच.आर.किशोर बोरसे यांच्याशी दुरध्वनी वर संपर्क साधुन सुरेश रोकडे यांचे म्हणने व झालेल्या अपघाताची भरपाई बदल्यात पर्मनन्ट करुन घ्यावे असे इच्छा आहे हे कळविल्यावर एच.आर.किशोर बोरसे यांनी काॅन्ट्रक्टर ला सांगितले नंतर काॅन्ट्रक्टरने सुरेश रोकडे यांना कंपनीने आपल्या आश्र्वासन दिले आहे की पर्मनन्ट करुन घेऊ त्यावर सुरेश रोकडे यांनी कंपनी विरोधात कुठलीही कारवाई केली नाही तरी आश्र्वासन देऊन ४ महीने होत आले सुरेश रोकडे ची प्रकृती आता चांगली झाली असली तरी त्याला दुसरे काम करणे शक्य होत नाही आहे तो आता कंपनीत काम करण्यासाठी तयार आहे तो आता कंपनीत कामाला जाऊ लागला आहे परंतु कंपनीने अद्याप पर्मनन्टची आॅडर दिली नाही किंवा त्याबाबत कुठलीही हालचाल दिसत नसल्यामुळे सुरेश रोकडे यांनी कंपनीचे एच.आर.यांना बऱ्याच वेळा पर्मनन्ट ची आॅडर मागणी केली असता एच.आर.साहेब सुरेश रोकडे यांच्या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सुरेश रोकडे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांना झालेल्या अपघाताची माहिती दिली व या कंपनीत असे बरेच कर्मचारी आहेत ज्यांना या कंपनीत अपघात होऊन दुखापत झाली आहे याची सर्व माहिती दिल्या नंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी आज दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी बेदमुथा कंपनित जाऊन तेथील एच.आर.गोळंबे साहेबांशी भेटून निवेदन दिले.
सुरेश रोकडे यांना आपण दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पुर्तता करावी व सुरेश रोकडे सारखे अपघात होऊन दुखापत झालेल्या इतर कर्मचाऱ्यांना देखील कायमस्वरूपी पर्मनन्ट करुन घ्यावे व आपली कंपनी शिंदखेडा तालुक्यात येते व आपण स्थानिक तरुण भुमिपुत्राना किमान ९०% आपल्या कंपनीत नोकरी दिल्या पाहिजेत असे निवेदन देऊन चर्चा केली व निवेदनात नमूद केले की सुरेश रोकडे यास तात्काळ कंपनीत कायमस्वरूपी पर्मनन्ट करुन घ्यावे व सुरेश रोकडे सारखे आपल्या कंपनीत कोणी कर्मचारी अपंग झाला असेल त्यास पण कायमस्वरूपी पर्मनन्ट करुन घ्यावे. स्थानिक भुमिपुत्राना नोकरी घ्यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असे म्हटले आहे त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू पाटील,प्रविण पाटील, दाजमल रोकडे, दिलीप रोकडे कंपनीतील कर्मचारी संदिप रोकडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here