धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस ची बॅटींग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेल्या घास पावसामुळे हिरावला आहे , तसेच सततच्या पावसामुळे अनेक घराचं देखील नुकसान झाले आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावी अशी मागणी धरणगाव शहर शिवसेनातर्फे तहसीलदार नितीन देवरे यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले
धरणगाव तालुक्यासह इतर खेड्यात मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे कापूस, केळी, उडीद, मूग, लिबु, तसेच सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा शेतातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहेतसेच शहरी भागातील व ग्रामीण भागातील घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे , आगोदर शेतकरी पूर्णपणेआर्थिक संकटानी होरपळलेल्या असून त्यात हे संकट खूप मोठे आहे म्हणून बळीराजाला या संकटांतून सावरण्यासाठी नुकसान भरपाईद्यावी, तसेचबहुतेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी पंचनामाची गरज आहे असे निवेदनात म्हटले आहे.
पंचनामे झाल्यावर त्वरीत रक्कम मिळविण्यासाठी राज्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी मंत्री दादा भुसे, जळगांव पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे नुकसान भरपाई मागणीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिले असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा.पी. एम. पाटील, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवंत चौधरी, विजय महाजन, अहेमद पठाण, बापू पारेराव, सुरेश महाजन, नंदू पाटील, धिरेंद्र पुरभे, कमलेश बोरसे, रवींद्र जाधव , वाल्मिक पाटील, दीपक चौधरी, नितीन चौधरी, राहुल महाजन, ओंकार मिसर, सागर गुरव , विनोद रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव शेतांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची नगराध्यक्ष निलेश चौधरी यांची मागणी







