बलात्कार आणि छेड काढणाऱ्या आरोपींबाबत योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

लखनऊ (उत्तर प्रदेश उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता जर उत्तर प्रदेशात कोणत्याही महिलेसोबत जर कोणी छेडछाड किंवा अत्याचार केल्यास संबंधित आरोपीला पकडल्यावर त्याचे पोस्टर संपूर्ण शहरात चौका चौकात लावले जाणार आहेत.
हे काम त्या प्रमाणेच केले जाईल, जसे की नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलनात महिलांवर अत्याचार आणि छेडछाड करणाऱ्या आरोपींना पकडल्यावर संबंधित आरोपींचे पोस्टर शहरात लावले होते.
तसेच या आदेशांतर्गत महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांना दंड करण्याची जबाबदारी देखील महिला कर्मचाऱ्यांवर च सोपविण्यात आली आहे. सरकारने महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हे कडक पाऊल उचलले आहे. तसेच या आरोपांचा चेहरा जगासमोर यावा आणि त्यांची बदनामी झाली पाहिजे यासाठी संबंधित आरोपीचे पोस्टर शहरात सर्वत्र लावले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here