नवापूर- अवैध गुटखा तस्करी…. LCB ची कारवाई… लाखोंचा माल जप्त

navapur-guthkha6

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील नवापूर शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्र 6 गुजरात राज्यातून मालेगाव कडे विमल गुटखा तस्करी होत असल्याचे गुप्त बातमी वरून नंदुरबार LCB पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित याच्या मार्गदर्शनात पो कॉ जितेंद्र तोरवणे महेंद्र नगराळे ,शांतीलाल पाटील यांनी पहाटे केलेल्या कारवाईत लाखोंचा विमल गुटखा सह सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे
पहाटेच्या सुमारास ट्रक MH04 FJ 5288 नंबर असलेल्या ट्रक नवापूर हायवे लगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पम्प जवळ सदर नंबर असलेल्या वाहनाची बातमी वरून तपासणी केली तर अवैध गुटखा आढळून आला होता
LCB च्या टीम ने सदर चा ट्रक ची तपासणी केली असता प्लॅस्टिक कचरा गोनी तसेच ट्रॅव्हल बेग दोर चे बंडल च्या आड मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेले विमल गुटख्या च्या गोनी आढळल्या विमल गुटखा 1लाख 40 रु किमतीचअसून जवळ जवळ सात लाखाचा मुद्देमाल जप्त करून नवापूर पोलिसात आरोपी चालक रफिक मोहमद नसीर आनि ट्रक मालक तय्यब भाई राहणार मालेगाव सुरक्षा अधिनियम 2006 चे कलम 26 (2) आणि कलम 188, 272 ,273, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here