सुल्तानपुर (उ.प्र ब्युरो चिफ एजाज अहमद) – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सामुहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच बलरामपूर येथे एका २२ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर पीडितेची कंबर आणि पाय तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, उपचारापूर्वीच पीडितेने अखेरचा श्वास घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद आणि साहिल अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती बलरामपूर पोलिसांनी दिली. तसेच पीडितेच्या हात, पाय, कंबरेला इजा पोहोचवण्यात आल्याचे वृत्त निराधार असल्याचं सांगत शवविच्छेदन अहवालात याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मंगळवारी सकाळी १० च्या दरम्यान महाविद्यालयात ॲडमिशनसाठी गेली होती. त्याचदरम्यान काही तरूणांनी पीडितेचे अपहरण केले आणि तिच्यावर त्याचवेळी सामुहिक बलात्कार झाला. रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचल्याने तिला फोन करण्यात आला. मात्र, तिचा फोन बंद लागला. या घटनेनंतर तरूणांनी गंभीर परिस्थितीत त्या तरूणीला रिक्षात बसवून तिच्या घरी पाठवून दिले. तिची गंभीर अवस्था पाहता तिला त्वरित रूग्णलयात नेण्यात आले. परंतु वाटेतच तिने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेख यादव यांनी संताप व्यक्त केला. हाथरसनंतर आता बलरापूरमध्येही एका मुलीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे आणि गंभीर अवस्थेत तिचा मृत्यू झाला आहे. भाजपा सरकारने बलरामपूरमध्ये हाथरसप्रमाणे निष्काळजीपणे वागू नये आणि गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी, असे अखिलेश यादव यांनी म्हटले.
Home राष्ट्रीय उत्तरप्रदेश हाथरस पीडितेची चिता शांत होत नाही तोवर उत्तर प्रदेशात आणखी एका तरूणीवर...







