शहादा येथे भव्य ऑनलाइन गरबा महोत्सव व स्पर्धेचा आगळावेगळा प्रयत्न

online-garba

नंदुरबार ( जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – जिल्ह्यातील शहादा येथे भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी नंदुरबार आयोजित भव्य ऑनलाइन गरबा महोत्सव स्पर्धा आयोजन करण्यात आले असून आमदार राजेश पाडवी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
करोना संसर्गाच्या काळात घरातच राहुनच गरबा खेळण्याचा आनंद महिलांना घेता यावा यासाठी ऑनलाइन गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व मुलींना प्रशिक्षण देऊन ऑनलाईन गरबा स्पर्धेचे आयोजन करावे अशी कल्पना भाजपा सांस्कृतिक मंडळाचे जिल्हाध्यक्ष निकेश राजपूत यांना सुचली. पूर्ण संसर्गाच्या काळात सोशल डिस्टंसिंग चे पालन करत घरूनच गरबा नृत्याचा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करून स्पर्धेत सहभाग नोंदवता येऊ शकतो.यामुळे महिला व मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. भाजपा कार्यकर्ते नेहमीच नवनवीन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबवत असतात त्यातील एक उत्तम उदाहरण आहे असे मतbeहाध्यक्ष विजय चौधरी यांनी व्यक्त केले. तसेच जास्तीत जास्त महिला व मुलींना या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले .ऑनलाइन गरबा स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र जमदाडे ,माजी नगरसेवक रवींद्र जमादार, भाजपा शहराध्यक्ष विनोद जैन, हितेंद्र वर्मा , सर्व भाजपा आघाड्यांचे प्रमुख तसेच इतर भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here