रोटरी सिनियर्सतर्फे परिचारीकांचा सन्मान

rotary-club-dondaicha

दोंडाईचा (संतोष कोळी) – दोंडाईचा शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचा सन्मान गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी व सौ हिता जानी यांच्याहस्ते देऊन करण्यात आला .

 

प्रशांत जानी यांनी रोटरी सिनियर्सच्या कामाची प्रशंसा करुन सांगितले कि संपुर्ण रोटरी परिवारासाठी अभिमानास्पद कार्य कोरोनाच्या काळात दोंडाईचा रोटरी सिनियर्सने केले आहे सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमची पाहणी करुन दररोज आवश्यकतेनुसार सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येतात म्हणजे तुमचे कार्य सतत व दररोज गरजुंपर्यंत सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. राजेश मुणोत यांनी सांगितले की कोरोनाच्या संकटकाळात प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात सुरक्षीत होता पण कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या वार्डात अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी व परिचारीका यांचे योगदानामुळे आज दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातुन हजारो रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.

 

दोंडाईचा सोशल ग्रुप व रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून बसवलेली सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमसाठी योगदान देणारे दात्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले . दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व रोटरी कोविड केद्रांतील सर्व रुग्णांना प्रोटीन पावडरचे डबे तसेच सर्व कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्क वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी रोटरीचे अँसिस्टंन्ट गव्हर्नर अनिष शहा ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अर्जुन नरोटे, डॉ हितेंद्र देशमुख,डॉ सचिन पारख ,डॉ प्रफुल्ल दुग्गड ,रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,इनरव्हीलच्या अध्यक्षा मयुरा पारख ,सचिव स्मितल गोस्वामी कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे सचिव राजेश माखिजा , रविंद्र पाटील ,सौरभ मुणोत ,प्रविण महाजन , डॉ राजेंद्र पाटील, महेंद्र चोपडा,सौरभ अग्रवाल इ सदस्यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here